हिंदुस्थानचे हायब्रीड रॉकेट हृमी-1 लाँच

हिंदुस्थानने शनिवारी पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट हृमी-1 लाँच केले. चेन्नई येथील तिरुविदंधाई या ठिकाणाहून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामीळनाडूमधील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. हायब्रीड रॉकेट हृमी-1 द्वारे, 3 घन उपग्रह आणि 50 पीआयसीओ उपग्रह यशस्वीरीत्या सबर्बिटल ट्रजेक्टोरीमध्ये ठेवले जातील. हे उपग्रह ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाशी संबंधित संशोधनासाठी डेटा गोळा करण्याचे काम करणार आहेत.

हे रॉकेट जेनेरिक इंधनावर आधारित हायब्रीड मोटर आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर पॅराशूट सिस्टमने सुसज्ज आहे. यामध्ये इको-फ्रेंडली आणि किफायतशीर यंत्रणा आहे. तसेच सीओटू ट्रिगर पॅराशूट सिस्टम दिली आहे. याच्या मदतीने रॉकेटचे घटक सुरक्षितपणे समुद्रात परत येऊ शकतात. तसेच अंतराळ प्रक्षेपणाचा खर्चसुद्धा कमी होईल. रॉकेटची एअर फ्रेम कार्बन फायबर आणि ग्लास फायबरपासून बनलेली आहे.