अस्सल खवय्यांच्या भेटीला ‘खाऊगल्ली’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिलेल्या व स्वामिराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘खाऊगल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरात नुकतेच झाले. पत्रकारिता, साहित्य, राजकारण, समाजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांसह खाद्य संस्कृतीचे अभ्यासक व खवय्ये यावेळी उपस्थित होते. खाने में क्या है… या लोकप्रिय शोमुळे घराघरात पोहोचलेले सेलिब्रिटी फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांच्यासोबत झालेल्या ‘खादाड गप्पा’ हे प्रकाशन सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. प्रकाशक रजनीश राणे यांच्यासह भक्ती चपळगावकर, रश्मी वारंग आदी यावेळी उपस्थित होते. साबडे यांनी दैनिक ‘सामना’त लिहिलेल्या अनेक लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.