‘मेड इन इंडिया Lava Z61 Pro’ स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लावाने आपला नवीन स्मार्टफोन Lava Z61 Pro हिंदुस्थानात लाँच केला आहे. फोनच्या मागील पॅनेलवर 8 मेगापिक्सेल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या खास फीचर्समध्ये 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5.45-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले समाविष्ट आहे. लावा या फोनला ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन म्हणून प्रमोट करत आहे.

किंमत

Lava Z61 Pro ची हिंदुस्थानी बाजारात 5,774 रुपये इतकी किंमत कंपनीने ठेवली आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन व्यतिरिक्त हा स्मार्टफोन ऑफलाइन स्टोअरमध्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन मिडनाइट ब्लू आणि अंबर रेड अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

फीचर्स

Lava Z61 Pro मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि 5.45 इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 18: 9 आस्पेक्ट रेशोसह येते. हा स्मार्टफोन 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. कमी बजेट श्रेणीच्या या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना 2 जीबी रॅम आणि 16 जीबी मेमरी मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या