सुनावणी सुरू असतानाच वकिलाचे अश्लील चाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई उच्च न्यायालयात व्हर्च्युअल सुनावणी सुरू असतानाच एक वकील अश्लील चाळे करत असल्याची बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याची न्यायमूर्तींनी गंभीर दखल घेतली असून वकिलांच्या चालण्या-बोलण्याकडे सामान्यांचे लक्ष असते, त्यामुळे प्रत्येकाने योग्य राहायला हवे. न्यायालयाची सुनावणी सुरू असतानाच वकिलाने केलेल्या अश्लील चाळ्यांमुळे न्यायालयालाही नामुष्की सहन करावी लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडीला गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. व्हर्च्युअल सुनावणी सुरू असताना आपला केस नंबर कधी येईल हे पाहत असतानाच वकिलाचा रोमान्स मूड झाला. त्याने संबंधित महिलेसोबत सलगी केली. या सर्व हालचाली कॅमेऱ्याने टिपल्या आहेत.