लक्ष्मण माने यांच्यावर 35 कोटींचा मानहानीचा दावा

22

सामना प्रतिनिधी, मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्यावर 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा दाखल केला असून माने यांनी आपल्यावर खोटे आणि तथ्य नसलेले आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माने यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी, अशी मागणीही अंजरिया यांनी केली आहे.

अंजरिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपात काम केल्याचे माने यांनी आरोपात म्हटले होते. तसेच वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याबद्दलही माने यांनी आक्षेप नोंदवला होता, असे अंजरिया यांनी म्हटले आहे. मात्र माने यांनी केलेले सर्वच्या सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचे सांगत अंजरिया यांनी आपल्या वकिलांमार्फत माने यांच्यावर 35 कोटी रुपयांचा दावा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या