15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गिरकचाळ धरणाला गळती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1982 मध्ये अस्तीत्वात आलेल्या  गिरकचाळ या धरणाची क्षमता 9.7 एमएम असून त्या धरणाला एकूण 421 दरवाजे आहेत. त्यापैकी 350 दरवाजे सध्या बंद आहेत. परतीच्या पावसाने हे धरण भरले असून या धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या जवळपास पंधरा ते विस गावांना तीन वर्षापासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तीन वर्षानंतर पहिल्यांदा धरण भरले असून परिसरातील गावांमध्ये धरण भरल्यामुळे आनंदोत्सव साजरा होत आहे. मात्र, धरणाला गळती लागल्यामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन ताबडतोब ही गळती बंद करावी असे आव्हान राणी अंकुलगा येथील सरपंच विकास जागले यांनी केले आहे.