क्रिकेटमधून ‘लेग बाय’ चा नियम काढून टाका, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमध्ये काही नियम असे आहेत जे अनेक वर्षांपासून चालत आलेले आहेत. यातील एक नियम आहे तो म्हणजे ‘लेग बाय’चा. यामध्ये पॅडला चेंडू लागल्यास आणि फलंदाजाने धाव घेतल्यास ती त्याच्या खात्यात जमा होते. या नियमाला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ याने विरोध केला असून ‘लेग बाय’ची गरज नसल्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग सुरू आहे. मार्क वॉ हा या सामन्यांसाठी समालोचनाचे काम करत आहे. समालोचन करत असताना मार्क वॉ याने लेग बायच्या नियमाबाबत त्याचे मत व्यक्त केले. त्याच्या मते लेग बाय क्रिकेटमध्ये असण्याची गरज नाही, खासकरून T20 सामन्यांमध्ये. मार्क वॉसोबत समालोचन करत असलेल्या इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मात्र हा नियम असायला हवा असं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं. मायकल वॉनने मार्क वॉ ला उत्तर देताना म्हटले की हा खेळाचा एक भाग आहे. यावर मार्क वॉने त्याला उत्तर देताना म्हटले की ‘हा खेळाचा भाग असला म्हणून काय झाले क्रिकेटच्या सुधारणेचा भाग म्हणून आपण हा नियम बदलू शकत नाही का ?’ लेगबायच्या धावा तुम्हाला का मिळायला हव्यात असा प्रश्नही त्याने विचारला आहे.

मार्क वॉने समालोचनादरम्यान म्हटलंय की ‘फलंदाजीचा अर्थ हा असतो की तुम्ही बॅटने चेंडू मारायचा असतो. ज्याने कोणी लेग बायचा नियम बनवला असेल तो सर्वसाधारण क्रिकेटपटू असावा. यावर मायकल वॉनने मार्क वॉची फिरकी घेताना म्हटले की मार्क वॉ याला एमसीसी क्रिकेट समितीचा सदस्य बनवायला हवा