आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा

1350

सार्वत्रिक निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या फिने गेल पक्षाचे नेते आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांना काल संसदेत पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या पसंतीच्या मतदानातही खासदारांनी नाकारले. त्यामुळे वराडकर यांनी आज आयर्लंडचे राष्ट्रपती मायकल हिग्गीस यांच्याकडे राजीनामा सादर केला. वराडकर 2017 साली आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.

आयर्लंडमध्ये 8 फेब्रुवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत लिओ वराडकर हेच हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत. संसदेत काल झालेल्या पंतप्रधान पसंतीसाठीच्या मतदानात वराडकर यांना 36 मते मिळाली.

फिने गेल या पक्षाचे अध्यक्ष मायकल मार्टीन यांना 41 तर रिपब्लिकन सीन फेन पक्षाच्या अध्यक्षा मेरी मॅकडोनाल्ड यांना सर्वाधिक 45 मते पडली. आयरिश रिपब्लिकन आर्मी या पक्षातून फुटून फिने गेल आणि रिपब्लिकन सीन फेन हे दोन पक्ष स्थापन झाले आहेत, मात्र सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या