
आरे कॉलनीतील युनिट नं-4 येथे सायंकाळी बिबटय़ाने बळवंत यादव या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला केल्याची घटना घडली. यादव यांना उपचारासाठी जोगेश्वरी पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे दाखल केले आहे.
तीन आठवडय़ांपासून आरे कॉलनीतील बिबटय़ाचे हल्ले थांबले होते. मात्र आज बिबटय़ाने ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांतील बिबटय़ाचा हा नववा हल्ला आहे. दरम्यान, यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून विशेष प्रयत्न सुरू असून वेगवेगळय़ा ठिकाणी 11 पिंजरे लावले आहेत.


























































