चंद्रपुरात विहिरीत पडला बिबट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपूरच्या भद्रावती भागामध्ये एका विहिरीमध्ये बिबट्या पडला आहे. इक्बाल पठाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं असून गेले 4 तास त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही विहीर मल्हारी बाबा सोसायटीमध्ये असून बिबट्याला पाहण्यासाठी या भागात मोठी गर्दी झाली आहे.