
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती आयुध निर्माणीच्या वसाहतीत एका बिबट्याने भररस्त्यात गायीची शिकार केल्याची घटना घडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक बघत असतानाही त्याची तमा न बाळगता बिबट्याने गायीला ठार केले. या घटनेचा थरारक व्हीडिओ सेोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर वन विभागाने तेथील प्रवाशांची रहदारी थांबवली आहे. आयुध निर्माणीच्या इंद्रप्रस्थ बागेजवळ ही घटना घडली असून. या घटनेचा अगदी जवळून व्हिडिओ करण्यात आला आहे. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


























































