VIDEO: 70 फूट खोल विहरीत पडलेल्या बिबट्याला जिवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । संगमनेर

संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहरीत बिबट्या पडलेल्या बिबट्याला जिवदान मिळाले आहे. कुंडलिक दुधवडे या शेतकऱ्याच्या शेतीतील 70 फूट खोल विहीरीत हा 5 वर्ष वयाचा बिबट्या पडला होता. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनी अखेर बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं आहे.

कुंडलिक दुधवडे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतीला पाणी देणयासाठी गेला असता त्याला शेतातील विहिरीतून कसलातरी आवाज आला. त्यामुळे दुधवडेंनी विहिरीत डोकून पहिले असता एक बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. बिबट्या विहिरीत पडल्याची खबर गावात वाऱ्यासाऱखी पसरली. मग गावच्या पोलिस पाटीलांनी वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दुधवडे यांच्या शेतावर पोहचले आणि बिबट्याला बाहेर काढण्याची कसरत सुरु केले आहेत. वन विभागाने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला मात्र बिबट्या काही पिंजऱ्यात घुसाय तयार नव्हता. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.