कुडाळमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

leopard sighting kudal digas humarmala sindhudurg news

कुडाळ तालुक्यातील डिगस व हुमरमळा गावांच्या सीमेवरील परिसरात वन्यप्राणी बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू आहे. हुमरमळा ते डिगस खांदीचेगाळू रस्त्यालगत मोटरसायकलस्वाराला बिबटय़ाचे दर्शन झाले. लोकवस्ती लगत बिबटय़ाचा वावर वाढल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात तसेच बिबटय़ाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच या परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाले होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी डिगस खांदीचे गाळू नजीक डिगस ते हुमरमळा श्री देव चव्हाटेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या श्री गवळदेव येथे एका मोटारसायकलस्वाराला बिबटय़ा दिसला.