राजस्थानातून विकायला मुंबईत आणली बिबटय़ाची कातडी आणि अस्वलाच्या नखांसह तस्करांना अटक

बिबटय़ाचे कातडे आणि अस्वलाची नखे राजस्थानहून मुंबईत विकायला आलेल्या एका तस्करासह त्याला मदत करणाऱया विक्रोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-7 च्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

भांडुप पंपिंग बस स्टॉप येथे तीन तस्कर बिबटय़ाचे कातडे आणि अस्वलाची नखे विकण्यासाठी येणार असल्याची खबर युनिट-7 चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. त्यानुसार श्रीधनकर, एपीआय दोरकर यांनी पथकासह त्या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा शाहीन रफिक अन्सारी यांच्याकडे असलेल्या गोणीत बिबटय़ाचे कातडे तर दुसरा आरोपी नाझीर शेख याच्याकडे अस्वलाची आठ नखे मिळाली. दोघांकडून हा 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघे ही विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहतात.

राजस्थानातील माजी वन अधिकारी वॉण्टेड

अटक आरोपींपैकी नाझीर याने राजस्थानातून बिबटय़ाचे कातडे आणि अस्वलाची नखे विकण्यासाठी आणली होती. त्याने हा मुद्देमाल राजस्थानातील एका माजी वन अधिकाऱयाकडून आणला होता. तो वन अधिकारीच प्राण्यांचे अवयव विकण्यासाठी देत होता. पोलीस त्या माजी वन अधिकाऱयाचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या