LG चा बजेट फोन लॉन्च, Xiaomi, Vivo, Samsung ला देणार टक्कर

इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी प्रसिद्ध कंपनी एलजीने हिंदुस्थानमध्ये एक जबरदस्त बजेट फोन लॉन्च केला आहे. कंपनीने हिंदुस्थानमध्ये LG K42 स्मार्टफोन लॉन्च केला असून ग्रे आणि ग्रिन अशा दोन रंगांमध्ये हा फोन ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा इतर फोनच्या तुलनेत मजबूत फोन असून उंचावरून पडल्यास किंवा अन्य परिस्थितीमध्ये खराब होण्याची शक्यता कमी आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

LG K42 ची टक्कर हिंदुस्थानमध्ये Xiaomi, Realme, Vivo, Oppo, Samsung, Motorola या आघाडीच्या कंपन्यांसोबत होणार आहे. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये हिंदुस्थानचा वरचा नंबर लागतो त्यामुळे कंपनीने LG K42 या स्मार्टफोनमध्ये 4 रिअर कॅमेरा सेटअप, मोठी स्क्रीन आणि अन्य फिचर्स दिले आहेत. तसेच कंपनी दोन वर्षांची वॉरंटी आणि एकदा फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसारखी ऑफरही देत आहे.

वैशिष्ट्य –

– 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले
– 3 GB RAM आणि 64 GB स्टोरेज
– octa-core 2.0GHz MT6762 प्रोसेसर

lg-k42

कॅमेरा –

फोनमध्ये 4 रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा सुपरवाइड अँगल सेंसर, तर 2-2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि मायक्रो सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. तसेच यात 4000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

lg-k42-2

किंमत –

LG K42 फोनची हिंदुस्थानमध्ये किंमत 10,990 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या