
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. देशभरात एलआयसीच्या विविध कार्यालयांमध्ये सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक पदांसाठी ही भरती केली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
‘एलआयसी’कडून 24 वर्षांनंतर पदभरती केली जात असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 एवढी असून नियमानुसार मागासवर्गीयांसाठी वयाची सवलत आहे. कोणत्याही विषयातील पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. पूर्वपरीक्षेसाठी रिझनिंग ऑबिलिटी, न्यूमेरिकल ऑबिलिटी आणि इंग्रजी हे तीन विषय असून ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुकांना 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळाकर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.


























































