
परीक्षा, मुलाखत किंवा इतर वेळीही तुम्हाला एखादी माहिती योग्य वेळी आठवेलच असे नाही. परीक्षेची तयारी करताना वाचलेले लक्षात राहिल की नाही, अशी तुम्हाला भीति वाटते का? बऱ्याच जणांना ज्या वेळी जे आठवायला हवे, ते आठवत नाही, अशांपैकी तुम्ही आहात का? स्मरणशक्ती कमी होणे, लक्षात न राहणे असे त्रास बऱ्याच जणांन होत असतात. काही वेळा विसरणे ही खूप मोठी समस्या नसली तरीही सतत विसरण्याची सवय, एखादी ऐकलेली, बघितलेली किंवा वाचलेली गोष्ट लक्षात राहण्याच्या प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असेल तर वेळीच सतर्क होणे आवश्यक आहे. अशा वेळी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बहुतेक वेळा पौष्टिक आहार, तणावमुक्त राहणे आणि दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र ही समस्या गंभीर असल्यास आयुर्वेदिक औषधांचा सल्लाही डॉक्टर देतात. स्मरणशक्ती वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याविषयी जाणून घेऊया.
- ज्याप्रमाणे शरीराला पोषणाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मेंदुच्या आरोग्याकरिताही असे काही पदार्थ आहे, ज्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये तूप, अक्रोड, भिजवलेले बदाम, ऑलिव्ह ऑईल, बेदाणे, खजूर आणि ताजी फळे खाऊ शकता तसेच मसूर, बीन्स, पनीर यामुळे मेंदुचे आरोग्य उत्तम राहते.
- बऱ्याचशा औषधी वनस्पती अशा आहे ज्या मानवी मेंदुची क्षमता वाढवू शकतात. यामध्ये गोटू कोला, अश्वगंधा आणि बकोपा या वनस्पती स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.
- गुलाबी आणि लाल रंगाची फळे, भाज्या, टरबूज, टोमॅटो यामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
- शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरात पुरेसे पाणी नसेल तर अशक्तपणा किंवा अस्थिर वाटू शकते. याला निर्जलीकरण असे म्हणतात. अशावेळी हर्बल चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होऊ शकते. यामुळे मानसिक शक्ती आणि स्मरणशक्ती वाढायलाही मदत होते. हर्बल चहामध्ये हिंग, हळद, ओवा आणि तुळस यांचा समावेश करावा.
- पुरेशी झोप न घेतल्यास मेंदुच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. यामुळे विसरणे, लक्षात न राहणे असे त्रास होऊ शकतात. यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची आहे. यासाठी दररोज ठरलेल्या वेळी लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. रात्री शांत झोप येत नसल्यास डोक्याला तेल मसाज वगैरे उपायांचा अवलंब करावा. शक्यतो सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेत झोपे होईल, असे पहावे.



























































