नाईट शिफ्ट संपवून घरी जाताना पाळा ‘या’ 8 सुरक्षा टिप्स !

आजकाल कार्यालयात महिलांनाही नाईट शिफ्ट करावी लागते. अशा वेळी त्यांच्या मनात सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी, भीतीची भावना असू शकते. काही वेळा त्यांना घरी येईपर्यंत रात्रीचे 12-1सुद्धा वाजतात. कार्यालयाकडून कॅबची सोय काही ऑफिसेस करतात, पण रात्री उशिरा घरी जावे लागत असेल किंवा प्रवासादरम्यान तुम्ही रेल्वे, बस स्थानक किंवा विमानतळावरून एकटेच घरी परतत असाल, तर काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

– रात्रीच्या शिफ्टमध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांनी सर्व आवश्यक आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आपल्या जवळ ठेवावेत. याशिवाय उशिरा काम करणाऱ्या प्रत्येक महिला व्यावसायिकाने आपल्या कार्यालयातील किमान तीन ज्येष्ठ सदस्यांचा क्रमांक स्पीड डायलवर आणि घरातील किमान तीन सदस्यांचा संपर्क क्रमांक स्पीड डायलवर ठेवावा. संकटाच्या वेळी घड्याळात संपर्क यादी तपासणे, नंबर शोधणे किंवा डायल करणे याचाही वेळ वाचेल.

– सदैव सतर्क राहावे. तुम्ही कितीही थकलेले असलात तरी कॅबमध्ये झोपण्याची चूक करू नका. रस्त्यावरील मार्गावर लक्ष ठेवा. अनेक वेळा तुम्हाला रात्री उशिरा एकटेच घरी परतावे लागते, त्यामुळे खासगी कॅबमधून प्रवास करताना काळजी घ्या. घरी फोन करून आपल्या कुटुंबातील एका सदस्याला कार्यालयात बोलवून घ्या. त्यांच्यासोबत घरी जा.

– कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही तुमच्या मालकाची जबाबदारी आहे. दिवस असो किंवा रात्र, स्वसंरक्षणासाठी वापरायची काही तंत्र स्वत: शिकून घ्या. यासाठी एक छोटा चाकू, मिरपूड स्प्रे तुमच्या पर्समध्ये ठेवा. रात्री उशिरा ऑफिस सोडून इतर कुठूनही येत असाल तर कुटुंबियांच्या संपर्कात राहा. कुठे आहात, घरी कधी परतणार याची माहिती देत ​रहा, अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षितता सुनिश्चित करू शकता.

– ऑफिसमध्ये रात्रीपाळीच्या वेळी पुरुष कर्मचाऱ्यासोबत काम करत असताना त्याच्या एखाद्या कृत्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर गप्प बसू नका. खूप उशीर होण्याआधी, स्वतःची बाजू कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे धैर्याने मांडा.

– सतत नाईट शिफ्ट करायची नसेल, तर वरिष्ठांशी बोला. अशा वेळी रोटेशन तत्त्वावर शिफ्ट चार्ट बनवण्याची मागणी वरिष्ठांकडे करा. सतत रात्रीची शिफ्ट आरोग्यासाठीही चांगली नसते. यामुळे कुटुंब सांभाळणे, वैयक्तिक कामे करणेही अवघड होऊन बसते.

– जर दिवसा ऑफिसची वेळ असेल तर तुम्ही वैयक्तिक कार, स्कूटी वापरा; परंतु रात्रीच्या शिफ्टवेळी वैयक्तिक वाहन वापरू नका, कारण रस्त्याच्या मधोमध गाडी, स्कूटी बिघडू शकते. याशिवाय कॅब चालकाने शॉर्टकटने नेतो, असे सांगितल्यास त्याला कडक शब्दात नकार द्या. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत वैयक्तिक वाहनाने जात असलो, तरी निर्जन किंवा शॉर्टकट मार्गाने जाऊ नका. घरी पोहोचायला एक तास लागला तरी चालेल.

– रात्री कॅबने घरी परतत असाल तर लक्षात ठेवा की, अतिरिक्त सुरक्षा रक्षकदेखील वाहनासोबत असावा. कॅबमध्ये महिला कर्मचाऱ्यांसोबत सुरक्षा रक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण वाटेत गाडी बिघडली, बंद पडली, तर सुरक्षा रक्षकाने दुसरी कॅब किंवा रिक्षा बुक करून ती तुम्हाला घरी सोडणे, ही त्याची जबाबदारी असते.

– कार्यालय व्यवस्थापन आणि वरिष्ठांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, महिला कर्मचार्‍यांना मोफत पिक आणि ड्रॉप सुविधा देणे पुरेसे नाही. संस्थेने सर्व पूल किंवा कॅब चालकांची माहिती तपासणे गरजेचे आहे. प्रत्येक महिला कर्मचारी आणि त्याच्या चालकाचा संपर्क क्रमांक कुटुंबियांकडे असणे आवश्यक आहे.