बदाम हे सहसा जसे असतात तसे खाल्ले जातात, पण जेव्हा भिजवलेले बदाम खाल्ले जातात तेव्हा बहुतेक सर्वजण साल काढून खाणे पसंत करतात. आणि बदाम खाल्ला तरी त्याची साल थेट डस्टबिनमध्ये टाकून दिली जाते. पण, बदामाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच फायदे बदामाच्या सालीचेही आहेत. बदामाच्या सालीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात आणि या सालींचा वापर हेअर मास्क, फेस पॅक आणि स्वादिष्ट चटणी बनवण्यासाठी करता येतो. बदामाच्या सालींचा वापर कोणत्या प्रकारे केला जाऊ शकतो सविस्तर जाणून घ्या.
बदामाच्या सालीचा वापर अशा प्रकारे करता येतो.
१. हेअर मास्क
बदामाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असल्यामुळे या सालींचा वापर करून केसांची ताकद वाढवता येते. बदामाच्या सालीपासून हेअर मास्क बनवण्यासाठी ही साले बारीक करून त्यात मध, एलोवेरा जेल आणि एक अंडे मिसळा. आता ही पेस्ट नीट मिक्स केल्यानंतर 15 ते 20 मिनिटे केसांना लावा आणि नंतर धुवा. यामुळे केसांना चमक येते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
२. बदामच्या सालाची चटणी
पौष्टिक बदामाच्या सालीची चटणी तयार करून सेवन करता येते. ही चटणी चवीलाच चांगली नाही तर आरोग्यासाठीही चांगली आहे. बदामाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी एका कढईत एक कप बदामाची साले, तूप आणि एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी उडीद डाळ तळून घ्या. या भाजलेल्या गोष्टी थंड झाल्यावर त्यात लसूण, हिरवी मिरची, आले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ एकत्र करून बारीक करून घ्या. आता दुसऱ्या भांड्यात तूप, कढीपत्ता, मोहरी आणि अख्खी लाल मिरची टाका. स्वादिष्ट बदामाच्या सालीची चटणी तयार होते.
३. फेस पॅक
बदामाच्या सालीचा परिणाम त्वचा सुधारण्यातही दिसून येतो. अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने बनलेला हा फेसपॅक बनवण्यासाठी बदामाची साले बारीक करून घ्या. ही पेस्ट जशी आहे तशी चेहऱ्यावर लावू शकता किंवा त्यात थोडे मध टाकू शकता. 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर ते धुवून काढता येते. चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येतो.
४. दातांवर घासता येते
हा एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे ज्याचा उपयोग केला जाऊ शकतो. बदामाची साले वाळवून जाळून टाका. या सालींची राख दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकते. या राखेने दात चांगले स्वच्छ होतात.