बऱ्याच जंक फूड आणि पॅकेज फूड खाण्यात स्मृतीभ्रंश होणारे घटक असतात. ज्यामुळे गंभीर धोका होऊ शकतो. यामध्ये विचारक्षमता कमी होण्याची शक्यता असते. आणि त्यामध्ये स्ट्रोक चा धोका जास्त प्रमाणात होतो. जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल तर आजपासूनच खाणे बंद करा. कारण आरोग्यासोबतच ते तुमचे वय आणि सौंदर्यालाही हानी पोहोचवत आहेत. यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
पिझ्झा, बर्गर, फ्राईज, पॅक्ड चिप्स, रेड मीट, बेकन, हॉट डॉग आणि सॉसेज यांसारखे पदार्थ खाणाऱ्यांसाठी चेतावणी देण्यात आली आहे. अशा लोकांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.अलीकडेच अमेरिकेतील अल्झायमर असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही एक संशोधन सादर करण्यात आले. 43 वर्षे चाललेल्या या संशोधनातून असे समोर आले आहे की जे लोक अतिप्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात खातात त्यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर धोका असतो. ज्यामध्ये स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.
याआधीच्या संशोधनात लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहासाठी जंक फूड जबाबदार असल्याचे आढळून आले होते. मात्र, नव्या अभ्यासात याचा संबंध स्मरणशक्तीशी जोडण्यात आला आहे.
अतिप्रक्रिया केलेले अन्न ज्यामध्ये चव वाढवण्यासाठी प्रतिक्रिया केली जाते. अशा पदार्थांत फायबर, विटामिन्स आणि प्रोटिन, प्रथिने कमी प्रमाणात असतात. आणि साखर, सोडीअम अशा लठ्ठपणा, कोलेस्ट्रोल आणि ह्रदयाशी संबंधीत धोका वाढवणारे घटक असतात.