
सामना प्रतिनिधी । मालवण
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तारकर्लीत नुकसान झाले आहे. येथील विजय शिर्के आणि संजीवनी शिर्के यांच्या गोविंद सदन येथे वीज कोसळली. यात ६० फूट लांबीच्या संरक्षक भिंतीचे आणि माडांचे गुरुवारी रात्री सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ सदृश पाऊस पडला होता. सोसाट्याचा वारा व विजांचा लखलखाटासह आलेल्या पावसाने साऱ्यांची दाणादाण उडविली होती. वादळी वाऱ्याची तीव्रता जास्त होती. तर तारकर्ली येथील विजय शिर्के आणि संजीवनी शिर्के यांच्या गोविंद सदन येथे वीज पडली. यात ६० संरक्षक भिंत माडांवर पडत पूर्णतः जमीनदोस्त झाली. तर सांडपाण्याच्या टाकीचेही नुकसान झाले आहे. सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
































































