शिक्षकांची संविधान साक्षरता शिबिरे आयोजित करावीत, राज्यातील साहित्यिकांची मागणी

326

देशाचे संविधान शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जावे यासाठी राज्य सरकारने शिक्षकांसाठी संविधान साक्षरता शिबिरे आयोजित करावीत अशी मागणी मराठी साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवून साहित्यिकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना संविधान साक्षर करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ गणेश देवी, शाहीर संभाजी भगत, डॉ. विश्वंभर चौधरी, प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रेमानंद गज्वी डॉ. महेश केळुसकर, हरी नरके, प्रा. वामन केंद्रे, जयराज साळगावकर, सुषमा देशपांडे, हेरंब कुलकर्णी, यशवंत मनोहर, अरुण म्हात्रे, साहेबराव ठाणगे आदींचा समावेश आहे.
ज्या संविधानाच्या आधारे आपल्याला देश घडवायचा आहे, त्या संविधानाची माहिती नागरिकांना होणे गरजेचे आहे.

शालेय वयातील विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकवणे शक्य आहे. हे काम प्रभावीपणे होण्यासाठी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने संविधानिक मूल्याच्या बाबत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखावा तसेच सर्व माध्यमातील बारावीच्या परीक्षांसाठी त्या त्या भाषेतून येत्या शैक्षणिक वर्षापासून किमान 50 गुणांसाठी संविधान मूल्य जागृती अभ्यासक्रम अनिवार्य करावा अशी मागणी साहित्यिकांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या