भाजपच्या संकल्पपत्राची घोषणा

#MahaElection2019 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपले संकल्पपत्र जाहीर केले. या संकल्पपत्रात 16 मुख्य घटक समाविष्ट आहेत. राज्यातील तळागाळातील जनतेचा विचार करून हे संकल्पपत्र बनवल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचं चित्र बदलत असल्याचं नमूद करताना पुढील पाच वर्षांतील विकासाची ध्येय या संकल्पपत्रात असल्याचं भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी नदीजोड  प्रकल्प, पुराच्या पाण्याचा दुष्काळी भागासाठी वापर, गुणात्मक शिक्षण, आरोग्यासाठी विशेष तरतुदी असे महत्त्वाचे मुद्दे या संकल्पपत्रात नमूद करण्यात आले आहेत.

या संकल्पपत्र सोहळ्यातील काही प्रमुख मुद्दे-

 • मुख्यमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांचं चित्र स्पष्ट केलं आहे.
 • हे महत्त्वाचे 16 घटक हे या संकल्पत्राचं सार आहे
 • राज्यातील विस्थापित, संकटग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी योजना
 • राज्यातील सर्व शहीद सैनिक आणि पोलिसांच्या कुटुंबांचं पुनर्वसन
 • सर्व कामगारांना संघटित करून त्यांची नोंदणी करणार आणि सामाजिक सुरक्षेसाठी विकास करणार
 • शिक्षण मूल्याधारित बनणार
 • आरोग्यासाठी महत्त्वाच्या योजनांचा विस्तार
 • संपूर्ण महाराष्ट्राला महानेट आणि भारत नेटने जोडणार
 • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सर्व वाड्या-वस्त्यांसाठी 30 हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधणार
 • राज्यात सर्व रस्त्यांची निर्मिती आणि देखभाल यांच्यासाठी स्वतंत्र प्रणाली
 • मूलभूत सुविधांसाठी 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार
 • 2022 पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देणार
 • एक कोटी रोजगार निर्माण करणार, महिला बचत गटांशी जोडून रोजगार निर्मिती करण्यात येणार
 • शेतीसाठी लागणारी वीज सौरउर्जेतून निर्माण करणार, जास्तीत जास्त वीजपुरवठा होणार
 • मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत नदी जोड प्रकल्प, कृष्णा कोयनेचं अतिरिक्त पाणी वळवणार
 • दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाया जाणारं पाणी वळवणार
 • 16 महत्त्वाचे घटक संकल्पपत्रात नमूद
 • मला फडणवीस यांच्यावर आणि सहकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. पुढील पाच वर्षं सुवर्णमय असतील
 • सिंचन, पिण्याचं पाणी हे महत्त्वाचे विषय हे महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकेल.
 • शिक्षणात स्कॉलरशिपवर भर, दर्जात्मक शिक्षणावर भर
 • गोरगरीबांसाठी आयुष्मान भारतसह योजना
 • महाराष्ट्रात वैद्यकीय विकास केला आहे.
 • शेती, पर्यटन, रोजगार, मजूर संघटना, तरुण, शिक्षण, आरोग्य या सर्व घटकांचा या समावेश
 • त्यामुळे संकल्पपत्र हे बहुउद्देशीय आहे
 • समाजातले दुर्बल घटक, शोषित, पीडित यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यात विचार
 • समाजातल्या शेवटच्या व्यक्तिचा विचार करून बनवण्यात आलं आहे
 • समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून संकल्पपत्राची निर्मिती
 • सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे लक्षात घेऊन बनवण्यात आलं आहे.
 • पण, हे संकल्पपत्र सर्व घटकांचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज आहे.
 • विरोधी पक्षाच्या संकल्पपत्रात फक्त तोंडी उल्लेख आहे.
 • संकल्पपत्र फक्त कागद नाही तर विचारपूर्वक बनवलेला दस्तऐवज आहे.
 • ही स्थिती संतोषजनक आणि समाधानकारक
 • अस्थिर राज्यापासून स्थिर विकसनशील राज्य
 • पाच वर्षांपूर्वी भ्रष्टाचार युक्त राज्य ते भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा प्रवास
 • फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत एक स्थिर सरकार निर्माण झालं.
 • आज महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झाला आहे. इथे चांगलं पारदर्शक सरकार आहे, स्थैर्य आहे.
 • मुख्यमंत्र्यांचं पद ही एक संगीत खुर्ची झालं होतं. राज्यात वाईट सरकार आणि अराजकाची परिस्थिती होती.
 • भ्रष्टाचार करणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती.
 • पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र हे अतिशय भ्रष्ट आणि अस्थिर राज्य होतं.
 • ही बाब अतिशय समाधानकारक आहे. त्यांनी पाच वर्षांत महाराष्ट्राला बदलून टाकलं
 • देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकारण संस्कृती बदलून टाकली, असं मी निश्चितपणे म्हणू शकतो
 • पाच वर्षांपूर्वी मीच निवडणूक प्रभारी होतो आणि मला फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्याची संधी मिळाली होती
 • जे. पी. नड्डा यांच्या भाषणाला सुरुवात
 • यासोबत समाजाचे विविध घटकांचा विचार संकल्पपत्रात केलेला आहे- देवेंद्र फडणवीस
 • अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी निर्माण करून शेती, सेवा, उद्योग या क्षेत्रांचा विकास होण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
 • रोजगारनिर्मितीसह ट्रिलियन डॉलर इकोनॉमी ही संकल्पना
 • कोकणातलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा विषय, नदीजोड प्रकल्पाचा विषय, तेलंगणाकडे वाहून जाणारं पाणी वळवणं, मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी परत करणं, पुरातून वाहून जाणारं पाणी वळवून दुष्काळी भागात नेणं, विदर्भ-मराठवाडा-उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात पाणी पोचवून दुष्काळमुक्त महाराष्ट्र असे विषय हाताळण्यात आले आहेत.
 • समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याची संकल्पना संकल्पपत्रात नमूद
 • शेतकऱ्यांकरता आणि राज्याकरता दुष्काळमुक्ती, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा यांच्यावर भर दिला आहे
 • राज्यात गेल्या पाच वर्षात जे कार्य झालं त्याचा अनुभव, प्रश्नांची उत्तरं आणि भविष्यातील दिशा यांचा विचार केला आहे
 • आज मला अतिशय आनंद वाटत आहे
 • देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
 • सुख, संपन्नता आणि सुरक्षितता ही आमची ध्येय- चंद्रकात पाटील
 • महाराष्ट्राच्या प्रचंड विकासाचा संकल्प करत आहोत.
 • शिवरायांचं स्मारक, इंदू मिल स्मारकही पूर्ण करणार
 • आगामी तीन वर्षांत समस्या राहणार नाहीत, याच्याकडे वाटचाल करत आहोत
 • दुष्काळामुक्त महाराष्ट्र हे आमचं ध्येय
 • महापुराचं पाणी दुष्काळी भागात सोडणार
 • महाराष्ट्रात एक विचित्र स्थिती, निसर्गाचं असंतूलन
 • जे विषय राहिले आहेत तेही मार्गी लागत आहेत.
 • कोणताही जातीय तणाव, गोळीबार नाही, असं शांततेचं राज्य महाराष्ट्रात सुरू आहे
 • शेतकऱ्यांची कर्जमाफी, आरक्षण असे विषय मार्गी लावले
 • प्रत्येक विषय चिघळू न देता मार्गी लावला
 • गेल्या 5 वर्षांत फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली काय केलं हे वेगळं सांगायला नको
 • विरोधकांकडे विरोधासाठी नेताही नाही आणि बुद्धीही नाही
 • उमेदवारी निश्चितीसह प्रचारातही आम्ही मजल मारली आहे.
 • गेले 15 दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
 • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाला सुरुवात
 • भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन संपन्न
 • सोहळ्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार संपन्न
 • मुंबईतील वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात प्रकाशन सोहळा
 • भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्राची घोषणा होणार
आपली प्रतिक्रिया द्या