Live- जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं आहे- मुख्यमंत्री

5224

 • आजपर्यंत सरकारला सहकार्य केलंत, तसंच पुढेही कराल अशी आशा बाळगतो
 • कोणताही धोका होऊ नये म्हणून सरकार पावलं उचलत आहे
 • हे संकट कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी संपवावंच लागेल
 • शैक्षणिक विषयांच्या दृष्टीनेही विचार सुरू आहेत.
 • काही गोष्टी सुरू झाल्यानंतर सगळं शिस्तीने करावं लागेल
 • बंधने शिथील करण्यापूर्वी जनतेला पूर्वकल्पना देण्यात येईल
 • सरकारच्या सूचनांचे पालन करा
 • कोणत्याही धार्मिक सण, उत्सव यांना परवानगी नाही
 • कारण नसताना घराबाहेर पडू नका
 • पुढचे काही महिने सावध राहावं लागेल.
 • सतत हात धूत राहा, तोंड चेहरा यांना हात लावू नका
 • कोरोनानंतर घराबाहेरही सावधान राहावं लागेल
 • कोरोनानंतर जग बदलेल
 • आपल्या आणि आपल्या माणसांसाठी थोडा वेळ थांबलात तर उपकार होतील.
 • आपल्या नकळत हा विषाणू पसरू शकतो. त्यामुळे त्याचे वाहक होऊ नका
 • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बंधुभगिनींना विनंती
 • महाराष्ट्रातले जे जिल्हे कोरोनामुक्त आहेत, ते तसेच ठेवावे लागतील.
 • महाराष्ट्रातल्या लोकांनाही रस्त्यावरून किंवा इतर मार्गाने जाऊ नका
 • उन्हाळ्यातला हा मोसम म्हणजे गंमत असते. पण या उन्हाळ्यात ती गंमत नाही
 • मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनाही हळूहळू त्यांच्या घरी पोचतं करण्यात येईल
 • त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतलेलं नाही.
 • तुमची व्यवस्था केली जाईल. आम्ही तुम्हाला तुमच्या राज्यात सोडू, धीर सोडू नका
 • मजुरांना विनंती की रस्त्यावरून चालू नका, तुमच्यासाठी ट्रेनच्या सुविधा सुरू झाल्या आहेत.
 • जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं आहे
 • उद्योग धंदे सुरू केले तर मजूर संक्रमित होतील आणि त्यावेळी अनिश्चित लॉकडाऊन लागेल
 • टीकेचा धनी झालो तरी महाराष्ट्रासाठी योग्य ते करणारच
 • लॉकडाऊन उठवला तर जे होईल ते मला महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही
 • लॉकडाऊनमुळे सगळं ठप्प पडलेलं नाही
 • संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य सुविधा वाढवण्यात येत आहेत.
 • मुंबईत आजघडीला 19 हजार 967 रुग्ण पॉझिटीव्ह, पैकी पाच हजार बरे होऊन घरी गेले आहेत
 • ज्यांना सेवा करण्याची इ्च्छा असेल त्यांनी स्वतःहून पुढे या
 • त्यांना वेळोवेळी आराम देणं गरजेचं आहे.
 • पोलिसांसह अन्य कोविड योद्धे तणावातून जात आहेत. त्यामुळे आजारी पडत आहेत.
 • मला अजूनही कोविड योद्ध्यांची गरज आहे
 • रुग्ण संख्या वाढत असली तरी आपण त्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हायचा प्रयत्न करत आहोत
 • 2 लाख 48 हजार बेड्स, अडीच लाख ऑक्सिजनसह असलेल्या रुग्णशय्या उपलब्ध करून देत आहोत
 • महाराष्ट्रात 1484 कोविड केअर सेंटर्स
 • इतरत्र कुठेही नसेल असी आरोग्य सुविधा इथे निर्माण केली आहे.
 • ऑक्सिजन सप्लाय असलेले बेड्स, आयसीयू बेड्सची सोय करण्यात येत आहे
 • मुंबईतील वरळी, गोरेगाव, वांद्रे कुर्ला संकुल, रेसकोर्स, मुलुंड, ठाणे इथे आवश्यक त्या आरोग्यसुविधा मिळतील
 • मुंबईत कोविड केअर सेंटर सेंटर्स सुरू करण्यात आलं आहे
 • हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र उभा करा
 • आपण उद्योग सुरू करून महाराष्ट्राला उभं करू
 • ग्रीन झोनमधील उद्योगांना बळ देण्यासाठी समोरून पुढे या
 • रेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत
 • ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे
 • आपल्यासमोर दोन मोठी आव्हानं आहेत
 • मनुष्यबळ कमी पडत असेल तर भूमीपुत्रांना पुढे या
 • महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी ग्रीन झोनमधील तरुणांनी आत्मविश्वासाने बाहेर पडा
 • राज्यात नवीन उद्योगपर्व सुरू करू
 • नवीन उद्योजकांना भाडे तत्वावर जमीन मिळेल.
 • नवीन उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच होईल
 • फक्त प्रदूषण न करण्याची अट राहील
 • ग्रीन इंडस्ट्रीसाठी कोणत्याही अटी नाहीत
 • महाराष्ट्रात 40 हजार एकरहून अधिक जमीन उद्योगांसाठी राखीव
 • नवीन सरकारच्या योजना या कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणले जाणारच
 • नवीन सरकार असताना आणि नवीन स्वप्न आहेत
 • सगळीकडे निर्बंध असतील तरी काही ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत
 • त्यात पाच लाख मजूर काम करायला लागले आहेत.
 • राज्यातील पन्नास हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी
 • एका बाजूला सगळं बंद करून हळूवार पणे काही गोष्टी सुरू करत आहोत
 • रेड झोन मात्र शिथील करता येणार नाही
 • ग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथील होत आहेत. ऑरेंजमध्येही समान परिस्थिती आहे.
 • आपण कोरोनाच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवलं आहे.
 • जर लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही
 • मनात प्रश्न उभे राहू शकतात की, नक्की काय सुरू आहे
 • महाराष्ट्रात आजही रुग्णांची संख्या वाढत आहे.
 • कोरोनाविरुद्धचं युद्ध कधी संपेल याची कुणालाही कल्पना नाही
 • 17 तारखेला जुना लॉकडाऊन संपला आणि पुढचे पंधरा दिवस पुन्हा सुरू आहे
 • हे सर्व बिनविरोध पार पाडायला मदत करणाऱ्यांचेही आभार
 • या परिस्थितीत मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानायचे आहेत
 • हे सगळं मी तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच करत आहे
 • मी आज आमदार पदाची शपथ घेतली.
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या