
राज्यातील राजकीय घडामोंडीसंदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे. शपथ घेणाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला अशी टीका करत राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही मार्गांनी याचं उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे-
- राष्ट्रवादीत फूट पडल्याने हा सर्व पेच निर्माण झाला आहे.- पटेल
- काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत. पटेल यांनी व्यक्त केला विश्वास
- राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही मार्गांनी भाजपला उत्तर देऊ.- पटेल.
-
Ahmed Patel, Congress: We will fight this on both fronts, political and legal. #Maharashtra https://t.co/77euYvgmTa pic.twitter.com/55mFDAPLh7
— ANI (@ANI) November 23, 2019
- नियोजित बैठकीमुळे पत्रकार परिषदेस हजर राहता आलं नाही- पटेल
- तिन्ही पक्ष एकत्र आहोत, अहमद पटेल यांचं प्रतिपादन
-
Ahmed Patel,Congress: Today was a black spot in the history of Maharashtra. Everything was done in a hushed manner and early morning. Something is wrong somewhere. Nothing can be more shameful than this. pic.twitter.com/MHpahKkE2A
— ANI (@ANI) November 23, 2019
- भाजपला विश्वासदर्शक ठरावात हरविण्यासाठी आम्ही एकत्र येऊ- अहमद पटेल
- राष्ट्रवादीतून काही लोकं बाहेर पडले, त्यांनी यादी बाहेर काढली.
- शपथ घेणाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला
- ज्या वेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला आम्ही इथे आलो. आमच्याकडून जराही उशीर झाला नाही. मात्र थोडी प्रक्रिया बाकी होती.
- या शपथविधीआधी काहीतरी चुकीचं घडलं आहे- अहमद पटेल
- शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत बैठक चांगली झाली होती.
- यादी न तपासताच शपथविधी झाला
- ज्या प्रकारे लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या त्याचा आम्ही निषेध करतो- पटेल
- कुठलीही खातरजमा न करता राज्यपालांनी शपथ दिली.काहीतरी चुकीचं घडलंय याचा मला संशय आहे.
- आज सकाळी ना बॅण्ड ना बाजा वाजवता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते काळ्या शाईने लिहले जाईल- काँग्रेस नेते अहमद पटेल
- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे.


























































