Live Corona Update- राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 1574 वर; दिवसभरात 210 नवीन रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

2399
 • राज्यात गेल्या 24 तासांत 201 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1574 वर पोहोचली आहे.  13 जणांचा मृत्यू झाला, तसेच 188 रुण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 • लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात 34 हजार गुन्हे दाखल
 • मुंबईत गेल्या 24 तासात आढळले 218 रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 993 वर

 • तामिळनाडूतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 911 वर
 • हरयाणातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 162 वर
 • देशातील कोरनाग्रस्तांचा आकडा 6039 वर, 206 जणांचा मृत्यू
 • देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात नाही. मात्र आपण काळजी घेतली पाहिजे – आरोग्य मंत्रालय
 • गेल्या 24 तासात 33 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 678 ने वाढला
 • बुधवारी देशभरात 16 हजार नागरिकांची चाचणी झाली. त्यातील पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या फक्त 2 टक्के होती
 • सोशल डिस्टंन्सिंग हे या लढाईतील मोठं शस्त्र आहे त्यामुळे हा लढा जिंकायला आपल्याला हा नियम पाळावा लागेल – आरोग्य मंत्रालय

 • तबलिगी समाजाचे 64 विदेशी नागरिक, 10 संबंधित स्थानिक आणि अन्य 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
 • उर्वरित सर्व परिचारिकांची तपासणी करण्याबाबत पालिकेने रुग्णालय प्रशासनाला कळवले आहे.
 • दोन परिचारिका कोरोनाबाधित असल्याचं आढळल्याने रुग्णालय प्रशासनाचा निर्णय
 • शुश्रुषा रुग्णालयातील सर्व परिचारिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
 • तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्या दृष्टीने बारा जणांना ताब्यात घेऊन नगर जिल्ह्यात हलविण्यात आले आहे
 • जिल्हा प्रशासनाने माहिती दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे
 • पाथर्डी तालुक्यातील माणिकडोह नदी येथील 1 इसम दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता त्याला व त्याच्या कुटुंबातील 12 जणांना आता ताब्यात घेऊन नगर येथे हलवण्यात आले.
 • तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह. आज घरी सोडणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 • यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे.
 • या पैकी 103 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
 • जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत 122 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत.
 • पुणे शहरातील रुग्णांची संख्या 190 झाली असून जिल्ह्यातील संख्या 225 झाली आहे.
 • यातील 11 जण @PMCCare च्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर 4 जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 • पुणे शहरात आणखी 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
 • यातील 9 जण पुण्याचे, अकोला 4, बुलढाणा 2 तर रत्नागिरीचा 1 रुग्ण
 • महाराष्ट्रात 16 नवीन कोरोनाग्रस्त, राज्याची रुग्णसंख्या 1380वर
 • दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 720वर, त्यापैकी 22 जण अतिदक्षता विभागात तर 7 जण व्हेंटिलेटवर
 • त्यांना राजीव गांधी स्पोर्ट्स् कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
 • धारावी भागात सापडलेल्या पाच नवीन रुग्णांपैकी 2 जण हे दिल्ली येथील मरकजहून परतले असल्याची माहिती
 • धारावी भागात कोरोनाचे पाच नवीन कोरोनाग्रस्त  सापडले, धारावीतील रुग्णसंख्या 22वर
 • दादर येथील रुग्णांची संख्या 6वर
 • यातील दोन रुग्ण शुश्रुषा रुग्णालयातील परिचारिका तर अन्य एक केळकर मार्ग येथील रहिवासी
 • मुंबईतील दादर परिसरात कोरोनाचे तीन रुग्ण सापडले
 • तर 199 जणांचा मृत्यू झाला आहे.
 • यांपैकी 5709 रुग्णांवर उपचार सुरू असून 504 जण बरे होऊन परतले आहेत.
 • देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 6412, गेल्या 12 तासांत 547 रुग्णांची वाढ
 • महाराष्ट्रातील पाच कारागृहांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनचे राज्याच्या गृह मंत्रालयाचे आदेश
 • हरयाणातील अंबाला येथे स्थानिकांनी सफाई कर्मचाऱ्यांना हार घालून आणि त्यांच्या कामासाठी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 • चर्चमधील माससाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
 • मुंबईतील माहीम परिसरातले सेंट मायकल चर्च गुड फ्रायडे असूनही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनाने 1783 बळी घेतले आहेत.
 • दिल्ली येथील जामा मशीद परिसरात ड्रोनद्वारे पहारा ठेवला जात आहे.
 • अनेक देश याच्या विळख्यात आले असून जगभरात बळी जाणाऱ्यांची संख्या 95 हजारांवर पोहोचली आहे.
 • संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
आपली प्रतिक्रिया द्या