Live : शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे विधानसभेच्या पहिल्या महिला उपसभापती

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाने उपसभापतीपदावरील दावा सोडला होता. त्यानंतर आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गोऱ्हे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. गोऱ्हे या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.

डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.