LIVE : ही एका युतीची पुढची गोष्ट; तुटणार नाही, फुटणार नाही! : उद्धव ठाकरे

190

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धापन दिनाला उपस्थित राहिले. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा यावेळी उपस्थित आहेत.

 • शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाची सांगता
 • आपण तुटणार नाही, फुटणार नाही आणि घेतलेला हिंदुत्वाचा वसा टाकणार नाही अशी शपथ घेण्याचे केले आवाहन
 • विजयामध्ये शिवसैनिकांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी केले कौतुक
 • युतीतील दुरावा आता दूर झाला आहे, विजयानंतर भाजपचे खासदारही भेटायला आले
 • शिवसेनेच्या व्यासपीठावर अनेकदा भाजपचे नेते आले आहेत
 • ओवैसी हिंदूचा अपमान करत असताना आम्ही गप्प बसणार नाही
 • लोकसभा निवडणुकीत देशद्रोह्यांच्या पराभव झाल्याचा आनंद
 • कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याने कलम 370 रद्द करणारच
 • स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला आहे
 • यापुढे युतीत वाद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतली आहे.
 • काही काम करायची आहेत, याचा आमचा निर्णय झाला आहे.
 • काहीजण याबाबत शंका उपस्थित करत आहेत, सरकारचे काम तर सुरु होऊ द्या
 • मोदी यांचे सरकार आल्याने आता राममंदिर झालेच पाहिजे
 • आता युती झाली आहे. मैदान साफ आहे, त्यामुळे पायात पाय अडकण्याचा धोका असतो
 • आता वेडात मराठे सात नाही, तर एकसाथ दौडणार आहेत.
 • समस्या सोडवल्यानंतर कशाला भांडायचे, आता विरोधीपक्षच नाही
 • मुख्यमंत्री आणि अमितश शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समस्या सोडवण्याचे काम सुरू झाले
 • आमचा वाद सत्तेसाठी नव्हता, जनतेच्या समस्यांसाठी होता
 • युती करतानाची भावना महत्त्वाची आहे, भावनेशिवायच्या युतीला अर्थ नाही
 • प्रत्येक शिवसैनिक प्रेम करताना जीव लावतो, तर लढताना जीवही देतो
 • आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण होते.
 • संघर्षाशी मुकाबला करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांना साथीदार दिले आहेत.
 • या कार्यक्रमाचे श्रेय तुम्हाला आहे.
 • शिवसेना वर्धापनदिनाच्या उपस्थितांना दिल्या शुभेच्छा
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

 • या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मानले आभार
 • पक्षाच्या वर्धापनदिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलावण्याची ही ऐतिहासीक घटना आहे.
 • आमची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे आदेश द्यावे लागले नाही, त्यांनी स्वंयस्फूर्तीने काम केले
 • उद्धव ठाकरे आणि आम्ही विकासाचे काही निर्णय घेतले आहे, ते योग्यवेळी जाहीर करू
 • शिवसेनाप्रमुखांचे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे.
 • मुख्यमंत्री कोण ही चर्चा प्रसारमाध्यमांना करू द्या, आपण विकासासाठी काम करू
 • आगामी काळात राज्यात दुष्काळ येणार नाही, यासाठी काम करायचे आहे.
 • देशात ताजमहाल उभा राहत असताना जाणता राजा सामान्यांचे अश्रू पूसत होता, ती प्रेरणा आमच्यासमोर आहे
 • आपली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे.
 • जनता आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास केला व्यक्त
 • शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचे ध्येय आहे.
 • आम्ही निवडणुकांसाठी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.
 • शिवसेना पक्ष वाढला पाहिजे, शिवसेना मोठी झाली पाहिजे अशा दिल्या शुभेच्छा
 • राष्ट्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे करायला हवे, त्यासाठी आपण काम करत आहोत.
 • आमचे हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही
 • शिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, आपण भगव्या ध्वजासाठी लढणारे आपण आहोत
 • विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी राज्यात वाघ आण सिंहाचेच राज्य येणार आहे
 • वाघ आणि सिंह एकत्र असल्यावर राज्य कोण करणार असा प्रश्नच उपस्थित होत नाही
 • काही काळ तणाव होता, मात्र, मतभेद दूर करून जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
 • सर्वात जास्त काळ एकत्र असलेली युती आहे.
 • शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचे प्रेम मिळवण्यासाठी आणि शिवसैनिकांची उर्जा मिळवण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत
 • उद्धवजींना मला बोलावताना आणि मला आमंत्रण स्वीकारताना प्रश्न पडले नाही, मात्र, इतरांना ते पडतात
 • आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत चर्चा होती
 • मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचा माठे भाऊ असा केला उल्लेख
 • छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केले नमन
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले स्वागत
 • षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात
 • मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या भाषणाला सुरुवात
 • शिवसेना ताठ कण्याणे आणि ताठ मानेने राज्यासह देशभरात खंबीरपणे उभी आहे
 • मराठी माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा शिवसेनाप्रमुखांनी दिली
 • राज्य सरकार आणि महापालिका जनतेच्या विकासासाठी काम करत आहे.
 • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे
 • युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही अनेक महत्त्वाच्या समस्यांमध्ये मार्गदर्शन करत आहेत.
 • शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार
 • शिवाजीराव अढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पाटील यांचा सत्कार
आपली प्रतिक्रिया द्या