Live – राम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्यांसमोर आज मी नतमस्तक होतो – उद्धव ठाकरे

2996

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

 • राम मंदिरासाठी जे शहीद झाले त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो.
 • आंदोलनात सहभागी झालेले काही जण अजुनही आमच्यासोबत आहेत त्या सर्वांना मानाचा मुजरा
 • हा समजूतदारपणा दाखविल्यामुळे हिंदुस्थान एक महासत्ता बनेल हा मला विश्वास आहे.
 • या नव्या पर्वाचं आपण सर्वांनी चांगल्याप्रकारे स्वागत करूया
 • आनंद जरूर साजरा करा पण वेडंवाकडं काही करू नका
 • अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांची ही आठवण होते
 • लवकरच लालकृष्ण आडवाणींची भेट घेणार, राम मंदिराच्या लढ्यात आडवाणींचे मोठे योगदान आहे.
 • अयोध्येतील सर्व परिस्थिती चांगली असेल तेव्हा जाईन, लवकरच जाण्याचा प्रयत्न आहे
 • मी येत्या दोन तीन दिवसात पुन्हा शिवनेरीला जाणार त्या पवित्र मातीला, शिवरायांना वंदन करणार
 • तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलेलो. ही चमत्कार घडवणारी माती नेल्यानंतर मला विश्वास होता की ही माती चमत्कार घडवेल. आणि वर्षभराच्या आत हा निकाल लागला.
 • आज 9 नोव्हेंबर आहे. गेल्या 24 नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होतो.
 • हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते
 • आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते तेव्हा शिवसेना प्रमुखांनी ते बळ त्यांना दिलं
 • न्यायव्यवस्थेचे आभार मानतो त्यांनी हा बरेच दिवस प्रलंबित असलेल्या खटल्यात न्याय मिळवून दिला.
 • गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद मिटला आहे.
 • सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे.
 • उद्धव ठाकरे शिवसेना भवन येथे पोहोचले
आपली प्रतिक्रिया द्या