
>> आनंद म्हाप्रळकर
निवृत्तीनंतरचे जीवन सुरळीत चालण्यासाठी आर्थिक बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन आतापासूनच करा.
2021 मधे ओईसीडी या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार दिसून येते की फक्त 12 टक्के कामगार हा विविध पेंशन स्कीममध्ये नोंदवले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त फार कमी कामगार हे ऐच्छिक फंड (पब्लिक प्रॉविडंट फंड आणि पोस्टल ट्रडिशनल स्कीम) अशा फंडात गुंतवणूक करत आहेत, ही परिस्थिति आव्हानात्मक आहे.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, 60 नंतर काम करण्याचा जोर आणि इच्छा कमी होऊ शकते आणि जर आपल्याला काम करायला लागले तर ते अधिक तणावपूर्ण होऊ शकते. कारण काही असो, गरजेकारिता बचत आणि गुंतवणूक करणे किंवा आर्थिक स्वातंत्र्याकरिता गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने नीट गुंतवणूक करून आपल्या निवृत्ती टप्प्यात आरोग्य, त्यानंतर मनःस्थिती आणि आर्थिक बाजून मजबूत करावी.
आपण आपली बचत आणि गुंतवणूक ही परिपूर्ण आहे की नाही हे बघणे गरजेचे आहे. त्याकारिता आपला आताचा खर्च आणि महागाई विचारात घेता आपण निवृत्त झाल्यानंतर आणि जसे आता आयुष्य जगत आहे त्या पद्धतीने आपल्याला खर्च करता येतील की नाही हे बघणे गरजेचे आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे की, जोपर्यंत आपण कमवत असतो तोपर्यंत आपल्याला बँक कर्ज देईल, पण निवृत्त झालेल्या लोकांना बँक कर्ज देणार नाही.. त्यामुळे आपल्याला ही सोय स्वतःच करणे आवश्यक आहे.
सेवानिवृत्तीनंतरचा निधी हा सगळ्यात महत्वाचा निधी आहे. आणि तो तयार करण्यात कोणीही विलंब किंवा दुर्लक्ष करू नये.




























































