एसटी ‘एलएनजी’वर धावणार, निविदा प्रक्रिया सुरू

एसटी महामंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी लिक्विफाइड नॅचरल गॅस अर्थात ‘एलएनजी’वर बसेस चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 500 बसेसना ‘एलएनजी’चे कीट बसविण्यात येणार असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच एसटी महामंडळ प्रथमच 500 साध्या बसेस भाडय़ाने घेणार असून त्याचेही टेंडर काढण्यात आले आहे.

एसटी महामंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी बसेसना ‘एलएनजी’चे कीट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 500 बसेसना ‘एलएनजी’चे कीट बसविण्यात येणार आहे. डिझेल मॉडेलच्या बसेसचे परिवर्तन एलएनजी कीट बसवून करण्यात येणार आहे.

500 बसेस भाडय़ाने घेणार

एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत ‘शिवनेरी’ आणि ‘शिवशाही’ अशा वातानुकूलित खासगी गाडय़ांचा समावेश करण्यात आला होता. परंतु एसटी महामंडळाने प्रथमच साध्या नॉन एसी गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी टेंडर काढले आहे. सात विभागांसाठी हे टेंडर काढले असून गाडय़ांची देखभाल व दुरुस्ती, इतर खर्च कंपनीने करायचा आहे. ‘बीएस-सहा’ बांधणीच्या एचएसडी साध्या 500 बसेस आठ वर्षांच्या भाडेकरारावर घेण्यात येणार आहे. याशिवाय एसटी महामंडळ स्वतःच्या मालकीच्या बसेस लवकरच घेणार असून त्यासाठी निविदा मागविणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या