स्मार्टफोन आता अत्यावश्यक गरज बनली आहे. एका घरात विमान तीन ते चार स्मार्टफोन असतात. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता कर्ज घेण्यास लोक मागेपुढे पाहत नसून ही संख्या आता चांगलीच वाढली आहे, अशी माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानात ट्रेंड बदलला असून स्मार्टफोनसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या तब्बल 37 पटींनी वाढली आहे.
2020 साली केवळ एक टक्का कर्ज घेतले जात होते, परंतु आता ही संख्या 37 टक्क्यांवर पोहोचली आहे. स्मार्टफोनप्रमाणे लोक आता टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनसाठी सुद्धा कर्ज घेत आहेत. होम क्रेडिट इंडियाचा रिपोर्ट हाऊ इंडिया बोरोनुसार, लोकांमध्ये आता घर आणि लाइफस्टाईलला अपग्रेड करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली आहे. सर्वात जास्त ग्राहक हे घराला नवा लूक देण्यासाठी कर्ज घेत आहेत. व्यापाराच्या विस्तारासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या 2020 च्या तुलनेत पाच पट वाढून 2024 मध्ये 21 टक्के झाली आहे.