स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- पालघरमध्ये शिवसेनेची प्रचारात आघाडी; ‘मशाल’च धगधगणार!

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वच प्रभागातील प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ धगधगणार असेच सर्वत्र वातावरण आहे.

शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम पिंपळे यांना शहरवासीयांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेच्या वतीने प्रभाग १ मधून अरिफ कलाडिया, प्रभाग २ मधून देवेंद्र भोये, प्रीती भानुशाली, प्रभाग ३ मधून रवींद्र गडग, प्रभाग ४ मधून राजेश गायकवाड, पूनम सांगळे, प्रभाग ५ मधून शिरीष संखे, शिल्पा जैन, प्रभाग ६ मधून सपना गावडे, प्रभाग ७ मधून वसीम शेख, प्रभाग ८ मधून राधा मानकामे, राहुल पाटील, प्रभाग ९ मधून चेतना मोरे, प्रभाग १० मधून आदित्य संखे, प्रभाग ११ मधून सुनील महेंद्रकर, प्रभाग १२ मधून प्रथमेश पिंपळे, अनुजा तरे, प्रभाग १३ मधून उत्तम पिंपळे, सुमन तिवारी, प्रभाग १४ मधून जयश्री कुंभार, हेमांगी भगत तर प्रभाग १५ मधून प्रीती मेढे आणि संदीप गायकवाड निवडणूक लढवत आहेत.

शिवसेना उमेदवार देवेंद्र भोये, प्रीती भानुशाली, राधा मानकामे, राहुल पाटील, सुनील महेंद्रकर, मानसी पिथवा यांच्या प्रचारासाठी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस, पालघर लोकसभा यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तिकर, जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, तालुका संघटक जयेंद्र दुबळा, शहरप्रमुख भूषण संखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली निघाली.

निवडून आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त नगर परिषद करणार असून ही लढाई चांगले शहर घडवण्यासाठी आहे. शहरातील पाणीटंचाई दूर करायची असून खड्डेमुक्त रस्ते, वाहतूककोंडीमुक्त शहर आणि चांगले निरोगी-सुंदर शहर बनवायचे आहे.
– उत्तम पिंपळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार