महिंद्रा, मध्य रेल्वे  उपांत्य फेरीत ; ओम ज्ञानदीप कबड्डी

महिंद्र, मध्य रेल्वे, इन्शुअर कोट (युवा फलटण) आणि  युनियन बँक यांनी धडाकेबाज विजयासह ओम् ज्ञानदीप मंडळच्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत इन्शुअर कोट विरुद्ध महिंद्रा आणि मध्य रेल्वे विरुद्ध युनियन बँक अशा झुंजी रंगतील.

उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत मध्य रेल्वेने नाशिकच्या एच.ए.एल.चा 37-24 असा सहज पराभव केला. तसेच महिंद्राने मुंबईच्याच रुपाली ज्वेलर्सचे आव्हान 46-32 असे मोडीत काढले. रुपाली ज्वेलर्स संघाने  7व्या मिनिटालाच महिंद्रावर लोण चढवत 11-05 अशी आघाडी घेत धक्का दिला. पण महिंद्राने स्वताला यातून सावरले आणि रुपालीवर मात केली. युनियन बँकेने 12-22 असे 10 गुणांच्या पिछाडीवरून मुंबई कस्टमचा 39-29 असा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. इन्शुअर कोटने रायगडच्या मिडलाईन फाऊंडेशनचा 62-40 असा पाडाव केला. मध्यंतराला 26-24 आघाडी असलेल्या इन्शुअर कोटने मिडलाइनच्या खेळाडूंना डोके वर काढूच दिले नाही.