
पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी पाच तासांचा ब्लॉक घेतला आहे. या अवधीत अनेक लोकल फेऱया रद्द, तर अनेक लोकल ट्रेन दादर आणि वांद्रेहून माघारी जाणार आहेत. चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या ट्रकवरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती, सिग्नल प्रणालीचे काम करण्यासाठी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या पाच स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बोरिवली आणि विरारहून येणाऱया अनेक लोकल ट्रेन दादर आणि वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. त्या गाडय़ांचा चर्चगेटकडील प्रवास दादर आणि वांद्रे स्थानकात खंडित केला जाणार आहे.































































