BREAKING – सीएसएमटी स्थानकात लोकलची बफरला धडक

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस स्थानकात हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक एकवर हा अपघात झाला. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. दरम्यान, या अपघातात कोणतीही हानी झालेले नाही.मात्र फलाट क्रमांक एकवरील वाहतून काहीकाळ खोळंबली होती.