लॉकडाऊननंतर सुरू झाली शाळा, एकाच आठवड्यात 250 विद्यार्थी शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

2158
corona-new

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान आता अमेरिकेतील काही भागात लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जॉर्जिया शहरात लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्याभरातच 250 पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोना प़ॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

अटलांटामधील चेरोकी काऊंटी या शाळेने त्यांच्या वेबसाईटवरून ही माहिती दिली आहे. गेल्या शुक्रवारपासून या शाळेने पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. त्यानंतर तीन दिवसातच अकरा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर खबरदारी म्हणून शाळा बंद करून सर्व विद्याथी व शिक्षकांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले. मात्र त्यानंतर तब्बल 250 शिक्षक व विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या