लॉकडाऊननंतर पळून जाणाऱ्या पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू

accident

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा सर्वात जास्त तडाखा हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कामधंद्याच्या शोधात घरापासून दूर आलेले अनेक जण हजारोंच्या संख्येने घरी परत जात असल्याचं चित्र आहे. गुरुग्राम येथे अशाच प्रकारे घरी पळून जाणाऱ्या पाच जणांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्राम येथील पंचगाव परिसरात रविवारी पहाटे तीनच्या सुमाराला हा अपघात झाला. दिल्लीहून पळून जाणाऱ्या पाच जणांच्या रिक्षाला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेमुळे रिक्षातील पाच जण जागीच ठार झाले. मरण पावलेल्यांमध्ये 3 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या