लॉक डाऊनमध्ये चोरांचा अडीच लाखांच्या विदेशी दारुवर डल्ला

802
फाईल फोटो

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील शेळगी रोडवरील श्री वैभव बार व हॉटेलच्या गोदामाचे दार तोडून अडीच लाखाचा रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केली. संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन चालू असताना व संचारबंदी लागु असल्याने सर्व बार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असतनाही औराद शहाजानी येथील शेळगी रोडवरील श्री वैभव बारच्या गोडाऊनचे दार तोडून चोरट्यांनी दिनांक 21 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीचा व संचार बंदीचा फायदा घेत ही चोरी केलेली आहे.

चोरांनी पळवलेली दारू ही विदेशी असून त्याची किंमत 2 लाख 58 हजार 410 दहा रुपये इतका आहे. तसेच बार मधील आवश्यक असणारे रजिस्टर व इतर कागदपत्रे सुद्धा चोरीस गेलेले आहेत. ही संचार बंदीमधील चोरी पोलिसांना आव्हान देणारी असल्याने याकडे औरादकरांचे लक्ष लागलेले आहे. कारण परीसरातील बहुतांश ठिकाणी सर्रासपणे देशी, विदेशी दारु विक्री सुरुच आहे व या दारु विक्रेत्यांवर मेहरनजर असल्याने तसेच काही पोलीस प्रशासनाचे महाभाग दिवसाढवळ्या ही या अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी दारु पित असल्याचे दिसुन येत आहे. संचारबंदीत पोलीसगिरी चालत असल्याने लोक सुद्धा उघडपणे बोलु शकत नसल्याने लोक या दारुविक्रीवर नाराजी व्यक्त करीत आहेत.

सदरील चोरी झालेल्या ठिकाणी औरादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी तपासणी केली आहे. तसेच लातूर येथील ठसे तज्ञ यांनीही तपासणी केली आहे संचारबंदीच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने होणारी दारूविक्री होत आहे. सर्वत्र पोलिसांची गस्त चालू आहे अशा परिस्थितीत सुद्धा अज्ञात चोरट्यांनी विदेशी माल चोरून पोलिसांना आव्हान दिले आहे. यासंबंधी औराद पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौड हे करीत आहेत.
यानंतर औराद मधील सर्व बार चालकास वॉचमन ठेवण्याची व सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या