आजपासून देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू; आता कुठेही घेऊ शकता राशन

4434

केंद्र सरकारने 1 जूनपासून देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू केली आहे. ही योजना लागू झाल्यानंतर आता नागरिक एका राज्याच्या रेशनकार्डाचा वापर करून दुसऱ्या राज्यात आपला रेशनचा वाटा घेऊ शकतात. ही योजना सुरू झाल्यानंतर देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला दिलासा मिळणार आहे. जे नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात आपले राज्य सोडून इतर राज्यात जातात. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना स्वस्त दरात रेशन दिले जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे जुने रेशनकार्ड बदलण्याची आवश्यकता नाही. तसेच इतर कोणत्याही राज्यात स्थलांतरित केल्यानंतर नवीन रेशनकार्ड बनवण्याचीही आवश्यकत नाही.

20 राज्यात सुरू होणार ही योजना

सोमवार (1 जून 2020) पासून देशातील 20 राज्यांमध्ये वन नेशन वन रेशन कार्डची योजना सुरू होणार आहे. या योजनेचा देशातील 67 कोटीहून अधिक नागरिकांना फायदा होणार आहे. मार्च 2021 पर्यंत ही योजना देशभरात राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. आतापर्यंत 85 टक्के आधार कार्ड पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीनशी जोडली गेली आहेत. रेशनकार्डधारकांना 3 रुपये दराने 5 किलो तांदूळ आणि 2 रुपये दराने गहू मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या