
लॉकडाऊनचा फटका देशातील शेतकरी आणि कष्टकरी मजुरांना बसला आहे. रोजंदारीवर काम करणारे मजुरही या काळात आपल्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. अशा खडतर परिस्थितीत राजस्थानमधील जोधपूर शहरातल्या एका शेतकऱ्याने सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. पाबुराम मांडा असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अडकलेल्या गरीब आणि कामगारांच्या जेवणासाठी आयुष्यभराची कमाई खर्च केली आहे.
आतापर्यंत मांडा यांनी अंदाजे 6500 लोकांना मोफत जेवण दिले आहे. माझ्या देशाला आता माझी गरज आहे, त्यामुळे मला जेवढे शक्य होईल तेवढी मदत मी करतोय, असे मांडा यांनी सांगितले.


























































