अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल; 31 हजारांची देशी विदेशी दारू जप्त

539

संचारबंदी लागू असतानाही शासनाच्या आदेशाचा भंग करीत आणि जेएनपीटीच्या नावाने मिळवलेल्या पाहता गैरवापर करून कल्याणहून उरण येथे देशी विदेशी दारू विक्री केल्या प्रकरणी उरण पोलिसांनी रजनीश कुमार पुरुषोत्तम शर्मा (42) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हाजीमलंग रोड-कल्याण येथील बार चालक  रजनीश कुमार पुरुषोत्तम शर्मा (42) हा सोमवारी करंजा येथे देशी विदेशी दारू अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची खबर उरण पोलिसांना मिळाली होती.उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलिसांनी सापळा लावला होता.रजनीश शर्मा करंजा येथील यशवंत बार जवळ मोटार सायकलवरून येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासणीत त्यांच्याकडे 31 हजार 290 रुपये किंमतीची देशी विदेशी दारू सापडली.शासकीय आदेशाचा भंग करीत आणि संचारबंदी लॉगडाऊन दरम्यानच्या काळात दारूबंदी असतानाही मानवी जीवन धोक्यात येईल असे हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे

आपली प्रतिक्रिया द्या