अंबड शहरात गुटखा विक्रेत्यांवर छापे; लाखो रुपयांचा माल जप्त

226

जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा व तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या पथकाने 4 मे रोजी छापे मारुन लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केल्याने एकच खळबळ माजली आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी लॉकडाऊन असल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. या लॉकडाऊनमध्ये काही लोक शासनाने विक्रीस प्रतिबंध केलेले सुंगधीत तंबाखू, गुटख्याची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळताच शहरात विविध ठिकाणी छापे मारून गुटखा व तंबाखुची करून विक्री करणाऱ्या कारवाई करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, एम.बी स्काट, हजारे, कांबळे,कुरेवाड, फलटणकर, बहुरे तंगे,उबाळे, चौधरी,देशमुख, महिला कर्मचारी पठाण, चालक साठे यांनी शहरातील महालक्ष्मी पेट्रोल पंप जवळील जगदीश नंदलाल लाहोटी यांच्या हरिओम प्रोव्हीजन येथून 300 नं. सुगंधीत तंबाखूच्या 17 लहान, 5 मोठ्या पुड्या जप्त केल्या आहेत. वसीम करीम तांबोळी यांच्या राहत्या घरातुन गोवा गुटख्याचे 18 पुडे जप्त केले तर शारदानगर येथील हकिम रशीद शेख यांच्याकडुन गोवा गुटख्याचे 5 पुडे जप्त केले तर नवीन मोढा येथील प्रल्हाद यांच्या जय भवानी किराणा दुकान येथून गोवा 1 पुडा जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या