लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 480 गुन्हे दाखल; 258 जणांना अटक

818

विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात 480 गुन्हे दाखल झाले आहेत. 258 जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 480 गुन्ह्यांची (ज्यापैकी 32 एनसी आहेत) नोंद 15 जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

  • व्हॉट्सॲप- 195 गुन्हे
  • फेसबुक पोस्ट्स – 196 गुन्हे दाखल
  • टिकटॉक व्हिडिओ- 25 गुन्हे दाखल
  • ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल
  • इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे
  • अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 51 गुन्हे दाखल
  • वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 258 आरोपींना अटक.
  • 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
आपली प्रतिक्रिया द्या