
कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांकर मालिकांचं पुनःप्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्क पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लककरच सुरुवात होणार आहे.
मनोरंजनाने परिपूर्ण आणि तितकेच उत्कंठावर्धक एपिसोड्स घेऊन स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैजू नंबर वन या मालिका सज्ज आहेत. आपल्या आवडत्या मालिका पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकीच उत्सुक आहेत कलाकार मंडळी. सर्कांची लाडकी आई म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर सेट आणि सहकलाकारांना मिस करत होत्या. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मनात प्रचंड उत्सुकता आहे. कधी एकदा सेटवर जातेय असं झालंय अशी प्रतिक्रिया मधुराणी यांनी व्यक्त केली.
























































