Lok Sabha 2019 – तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात 63.24 टक्के मतदान

17
election

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात आज 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. विविध राज्यांमधील आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली असून देशभरात एकूण 63.24 टक्के इतकं मतदान झालं आहे.

या यादीत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल राज्यात झालं असून सर्वात कमी मतदान जम्मू आणि कश्मीर या राज्यात झालं आहे. या दोन्ही राज्यांची आकडेवारी अनुक्रमे 79.36 आणि 12.86 अशी आहे. त्यानंतर आसाम, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांचे क्रमांक असून या तीन राज्यांत अनुक्रमे 78.29, 78.52 आणि 71.09 टक्के इतकं मतदान झालं आहे. केरळमध्येही 70.21 टक्के इतकं मतदान झालं आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिशा या राज्यांनी आकडेवारीची साठीही गाठलेली नाही. त्या तुलनेने दादरा -नगरहवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनुक्रमे 71.43 आणि 65.34 इतकं मतदान झालं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या