Photo : पोल एक्झिट… मतदारच राजा!

2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. मतमोजणीआधी भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला चारशेपार जागा देणाऱया एक्झिट पोलची मतमोजणीनंतर हवा निघाली. लोकशाही देशात मतदार हाच राजा असतो हे आजच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. देशातील तमाम मतदार राजांनी सर्व एक्झिट पोल फोल ठरविले. एक्झिट पोल करणाऱया तथाकथित गोदी मीडिया आणि तत्सम यंत्रणांच्या कानाखाली सणसणीत चपराक लगावली. हिंदुस्थानसारख्या देशात हुकूमशाहीला कोणताही थारा नाही हे आजच्या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Displaying DSC_8761.jpg

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिदेसाई यांनी मिंधे गटाच्या उमेदवारांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळववा.

Displaying DSC_0133.jpg

त्तर पूर्व (ईशान्य) मुंबई मतदारसंघातीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील

Displaying DSC_8906.jpg

मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला.