लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुसंडी मारत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी भाजपच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा एक लाख मतांनी पराभव केला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावारण होते. त्यामुळे नाशिक तसेच दिंडोरी भागामध्ये कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती पवार यांचा प्रचार करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या रोषापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू फोल ठरली आणि भारती पवार यांचा पराभव झाला.
गेल्या चार लोकसभा निवडणुकांचा निकाल
चौदावी लोकसभा २००४-२००९ हरीशचंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हरीशचंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हरीशचंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- भारती प्रवीण पवार भारतीय जनता पक्ष