
लोकसाहित्य आणि लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायिका’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ येथील संत नामदेव सभागृहात होणार आहे. ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे प्रकाशित होणाऱया या पुस्तकात ‘पद्म’, तसेच ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार-प्राप्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या महिला लोककलावंतांच्या जीवनाचा, त्यांच्या कलेचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षांचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे ‘ललित कला केंद्र, गुरुपुल’, ‘पद्मगंधा प्रकाशन’ आणि ‘महाराष्ट्र कला संस्पृती मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱया या प्रकाशन समारंभाला कर्नाटकच्या मंजम्मा जोगती, ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्पृती मंडळा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, तसेच ‘कालनिर्णय’कार जयराज साळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान प्रोफेसर सुरेश गोसावी भूषविणार आहेत.