टेलिफोन बूथ झाले कालबाह्य, लंडनमध्ये 100 वर्षे जुन्या बॉक्सचा लिलाव

मोबाईलच्या जमान्यात सार्वजनिव टेलिफोन आणि त्यांचे बूथ कालबाह्य झाले आहेत. येत्या काळात टेलिफोन बूथ केवळ संग्रहालयात बघायला मिळतील, असंच चित्र आहे. लंडनमध्ये अशाच एका जुन्या टेलिफोन बूथचा लिलाव सुरू आहे. स्कायर माईल परिसरातील हा बूथ सुमारे 100 वर्षे जुना आहे. तो नऊ चौरस फूट असून त्याला 46 लाखांची प्राथमिक बोली लावण्यात आली आहे.

लंडनमधील या सर्कात जुन्या टेलिफोन बूथला प्रसिद्ध आर्किटेक्ट सर गिलेस गिल्बर्ट यांनी ‘डिझाईन’ केले होते. संपूर्ण लंडनमध्ये आता असे 224 बूथ शिल्लक आहेत. या बूथला आता कमर्शिअल स्पेस या श्रेणीत विकायला काढले आहे. त्यामुळे जो कुणी बूथ खरेदी करेल तो बूथमध्ये लायब्ररी, कॉफी शॉप किंवा बेकरी सुरू करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या